Saturday, June 22, 2019

कुछ पल तो ठहर जाओ

परवा गाडी वरून जाताना एक अकॅसिडेंट बघितला. एक 30 वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि he was on the spot dead. शेजारी त्याची बायको बसलेली. थोडं फार लागलेलं तिला पण शुध्दीत होती.

मला काही कळलंच नाही काय करावं ते. काय चाललं असेल तिच्या मनात आत्ता या क्षणी..

कुछ पल तो ठहर जाओ ना
या फिर लौट के आओ ना
यूं कहते नहीं अलविदा
मुड जाओ इधर आओ ना

तुम्हें ढूँढें मेरी आँखें
तुम्हें खोजे मेरी बाहें

तुम बिन जिया जाए कैसे
कैसे जिया जाए तुम बिन

अरे कुठं चाललायस मला सोडून असं. थोडा वेळ थांब आणि परत ये रे माझ्यासाठी. अरे पाऊस येताना पण थोडा वेळ आधी वर्दी देतो आणि तू असा अचानक कुठं निघून चालला आहेस. थांब थोडं आणि बोल माझ्याशी. खूप बोलायचं राहिलय आपलं पण कुठं शोधू तुला मी आता. कशी राहू तुझ्याशिवाय... एवढं तर सांगायला ये.

कितने थे वादे किये
इक पल में तोड़ दिए
झूठा नहीं तू मुझको पता है
बस थोड़ा रूठा सा है
तू रूठे मैं मनाऊं
पर तुम बिन कहाँ जाऊं

सकाळीच तर मला मिठीत घेऊन आणि माझा हात पकडून मला वचन दिलेलं होतंस की शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या सोबत राहशील आणि कधीही एकट टाकणार नाहीस मला. मी पण तुझ्या छातीवर डोकं ठेवून तुझ्या हृदयाचे ठोके ऐकले होते. आणि तू आता असा निपचित पडला आहेस. स्वतःच्या शब्दाला जगणारा आहेस तू हे पक्कं माहीत आहे मला पण मग  तू चिडला तर नाहीस ना रे माझ्यावर??
चिडला असशील ना तर तुझा राग झटकून टाक आणि माझ्या जवळ ये. कशी राहू तुझ्याशिवाय एवढं तर सांगायला ये...

ये आसमान और ज़मीन
बिन तेरे कुछ भी नहीं
साँसों से मोहलत ज़रा मांग लेना
यूं उठ के जाते नहीं

या फिर तू मुझे ले चल
संग अपने जिधर तू चला

घरी आपलं पिल्लू आपली वाट बघत बसलं असेल. काय सांगू मी त्याला. तू नसशील तर काय करू मी इथं एकटी, कशी सांगू त्याला की त्याचा बाबा आता येणार नाही म्हणून. अरे, तू उशिरा आलास तर घर खायला उठतं मला आणि आता तर तू आयुष्य सोडून चालला आहेस. तू सांग देवाला की थोडा वेळ दे मला, असा डाव अर्ध्यावर सोडून कुणी जातं का?
आणि जर तू येणार नसशील ना तर मलाच घेऊन चल तुझ्याबरोबर.. मी नाही राहू शकणार रे तुझ्याशिवाय... कसं रे समजावून सांगू तुला... ऐकतो आहेस ना रे राजा??

© Sharduli

No comments: