माझं ऑफिस
घरापासून २० किमी वर आहे आणि तिथपर्यंत पोहोचायला स्कूटर वरून ४५ मिनिटं लागतात.
तर आज सोमवार असल्यानं अगदी जीवावर येऊन उठून, आवरून सकाळी ऑफिसला माझ्या
स्कूटर वरून येत होते.ऑफसच्या रस्त्यावर एक सिग्नल लागतो आणि तो पार केला तर
जवळपास ५ किमी पर्यंत जंगलासारखा एअर फोर्स चा भाग आहे जिथं आजूबाजूला काहीच नाही.
तर त्या सिग्नल वरून १ कमी पुढं पर्यंत पोचले असताना दोन माणसं त्यांच्या
दुचाकीवरून आली आणि माझ्या स्कूटर च्या मागच्या चाकाकडं खुणा करून काहीतरी सांगू
लागली. कधी आपली ओढणी चुकून निसटली असेल तर ती चाकात जाऊ नये म्हणून बरेच जण खुणा
करून ती व्यवस्थित घ्यायला सांगतात, पण मी तर आज ओढणी घेतलीच
नव्हती. कदाचित मागच्या चाकातली हवा कमी झाली असेल किंवा ते पंक्चर झाले असेल आणि
हेच सांगण्याचा ती माणसं प्रयत्न करीत असतील अश्या विचारानं मी बाजूला गाडी
थांबवली आणि काय झालं हे त्यांना विचारलं. त्यांनी पण माझ्या शेजारी गाडी थांबवली
आणि तेलुगू मध्ये एकदम पॅनिक होऊन म्हणू लागले,
"तुम्हाला काय ऐकू येत नाहीये का? दोन किमी
पासून आम्ही तुम्हाला बोलावतोय."
तो पर्यंत मी खाली उतरून मागचं चाक बघितलं तर हवा वगैरे सगळं ठीक वाटत होतं . मी त्यांना म्हटलं नक्की काय झालंय? तर परत (तेलगू मध्येच) म्हणायला लागले कि जर अजून थोडा वेळ गाडी अशीच चालवली असती तर गाडीला आग लागली असती. म्ह्णूनच तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करतोय तर तुम्ही तसंच पुढं चाललाय.
मी सगळ्यात आधी म्हटलं कि मला तेलगू कळत नाही तेव्हा काय ते स्पष्टपणे हिंदी नाहीतर इंग्लिश मध्ये सांगा. तर त्यातला एक जण बोलला, "तुमच्या गाडीच्या पाठीमागं स्पार्क येतोय."
हे ऐकून खरं तर क्षणभर मी घाबरले. एक तर आपल्याला गाडीमधलं जास्त काही कळत नाही. आत्तापर्यंत ब्रेक केबल तुटली, पंक्चर झालं या पलीकडे जाऊन माझ्या गाडीनं मला कधीच धोका दिलेला नव्हता आणि त्यामुळं हा नवा प्रॉब्लेम (तो पण स्पार्क, गाडी जळेल वगैरे) ऐकून मी घाबरले. परत गाडी सुरु केली आणि खरंच काही झालं तर काय करायचं ह्या विचारानं गाडी पण सुरु करावीशी वाटेना. तरी पण त्या माणसाला म्हटलं, "तुम्ही एकदा गाडी सुरु करून दाखवा बरं, मी बघते कुठं स्पार्क येतोय ते." तर हा लगेच पुढं आला आणि म्हणाला, "तुम्ही थांबा, गाडी थोडी कडेला लावा. मी बघतो नक्की काय झालंय ते. मी पण मेकॅनिकच आहे आणि म्हणूनच मला कळलं कि काहीतरी लोचा आहे. तुम्हाला गाडीमधनं काही विचत्र आवाज ऐकू आला नाही का?" मी म्हटलं नाही आला तर तो म्हणाला, "कदाचित हेल्मेट घातल्यानं ऐकू आला नसेल. तुम्ही एक काम करा, गाडी त्या बाजूनं थोडी आडवी करा, आणि मला एक कापड द्या, मी बघतो नक्की काय झालंय ते." असं म्हणत स्वतःच्या हातातलं एक कापड घेऊन तो गाडीच्या उजव्या बाजूला वाकला पण. मी गाडीच्या डाव्या बाजूला जाऊन गाडी एका बाजूला झुकवली आणि कापड काढून देऊ लागले. तेवढ्यात तो माणूस म्हणाला, "मॅडम इकडं या, बघा हि पाईप निघून गेलीय." मी खाली वाकून बघितलं तर सायलेन्सर च्या वरच्या भागात असणारी एक पाईप गायब होती. गाडीची इतकी माहिती नसल्यानं नक्की काय झालाय हे मलाही कळेना. तेवढ्यात तोंडातून थोडी थुंकी माझ्या सायलेन्सर वर लावून त्यानं म्हटलं "बघा मॅडम, सायलेन्सर किती गरम झालाय. आणि आता ह्या पेट्रोलच्या पाइपमधनं जर पेट्रोल खाली सायलेन्सरवर पडलं आग नाही का लागणार?"
एक तर पेट्रोलची पाईप सायलेन्सरवर असू शकत नाही हा common sense चा भाग आहे. दुसरं म्हणजे गाडीतलं पेट्रोल तर कमी झालेलं वाटत नव्हतं. जर हि पाईप कुठं पडून गेली असेल तर धबाधबा पेट्रोल वाहून गेल्यानं आत्तापर्यंत पेट्रोलची टाकी रिकामी व्हायला हवी होती. एका बाजूला तो सांगतोय हे चुकीचं आहे असं वाटत होतं तर दुसऱ्या बाजूला "काय माहित, खरं सांगत असेल तर गाडी सुरु केल्यावर accident होईल" ह्याची भीती पण वाटत होती.
मी त्याला म्हटलं "ठीक आहे, मी गाडी ढकलत पुढच्या एका सर्विसिंग च्या दुकानात घेऊन जाते आणि ठीक करून घेते, तुम्ही जावा." तर तो म्हणाला, "एवढं कशाला मॅडम, हा (त्याच्याबरोबरच्या माणसाकडे हात दाखवून) गाडीवरून जाऊन ती पाईप घेऊन येईल. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही चालत जाऊन घेऊन या. मी नक्की काय घेऊन यायचं ते सांगतो. पण मॅडम, तुम्ही इतक्या लांब चालत जाऊन येईपर्यंत खूप वेळ लागेल, तुम्ही त्याला पैसे द्या, तो घेऊन येईल. हवं तर बिल पण आणून देईल." मी म्हटलं, "अंदाजे किती पैसे होतील? तर तो म्हणाला, "मॅडम पाच-सहाशे होतील."
त्यावेळी मला थोडी शंका आली. मी विचारलं, "इतके पैसे?' तर म्हणाला, "मॅडम, कॉपर ची पाईप असते त्यामुळं तेवढे पैसे लागतातच. हवं तर तुम्ही पण ह्याच्या बरोबर जावा." मला त्याच्याकडं पैसे द्यायला पण नको वाटू लागलं आणि गाडी इथं अशीच ठेवून जायची पण भीती वाटू लागली. मनात म्हटलं, 'काय व्हायचं ते होऊ दे, आपणच आपल्या गाडीवरून जाऊ. जवळजवळ १०-१२ किमी गाडी चालवली पण इतका वेळ स्पार्क मुळं काही झालं नाही, बघूया आता काय होतंय ते.' असा विचार करून गाडी सुरु करायला गेले तर गाडी पण सुरु होईना.
सगळ्यात आधी नवऱ्याला फोन केला, काहीबाही मराठीतून बोलल्यासारखं केलं आणि त्या माणसाकडं बघून सांगितलं कि "तुम्ही इथंच थांबा, माझा नवरा इथून ४ किमी च्या अंतरावर आहे आणि तो ५ मिनिटात इथं येईल. तो आल्यावर कसली पाईप आणायची ते सांगा, तो घेऊन येईल आणि तुम्ही ती बसवून द्या हवं तर." असं म्हटल्या म्हटल्या दोघांनी गाडीवर टांग टाकली आणि म्हणाले, "जर तुमचा नवरा येणार असेल तर ठीक आहे, तुम्ही काय ती दुरुस्ती करून घ्या, आम्ही निघतो." एवढा वेळ माझी आणि माझ्या गाडीची इतकी काळजी असल्याचं दाखवणारा आणि गाडी दुरुस्ती साठी अजून तास भर पण थांबू शकतो असा अविर्भाव असलेला तो माणूस दोन मिनिटांत गायब झाला.
तो निघून गेल्यावर मी नवऱ्याला झालेला सगळा वृत्तांत सांगितलं. त्या माणसानं 'गाडीला काय झालंय' हे बघायचं नाटक करून ती पाईप काढून घेतली असेल हि शंका पण व्यक्त केली. नवरा खूप दूर त्याच्या ऑफिसपाशी असल्यानं येण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी मागं वळून गाडी १ किमी ढकलत नेण्याचा निर्णय घेतला. अर्धा तास गाडी ढकलून मी एका सर्विसिंग शॉप मध्ये घेऊन गेले. त्या मेकॅनिकला विचारल्यावर असं कळलं कि ती एअर पाईप आहे. मी त्याला विचारलं कि ती पाईप अशीच निघून पडू शकते का? त्यावर त्यानं सांगितलं कि हि पाईप अशीच पडणे खूप अवघड आहे, कुणीतरी ती उचकटून काढल्याशिवाय ती निघू शकत नाही. आणि आता गाडीला हवेचा सप्लाय नसल्यानं गाडी सुरु होत नव्हती. शेवटी ६० रुपये देऊन मी नवीन पाईप घालून घेतली आणि लाखो रुपयांचा अनुभव पदरात पडून घेऊन ऑफिस ला २ तास उशिरा पोचले.
आजपर्यंत असला कुठलाच अनुभव मला आलेला नाही. हैद्राबाद शहरात फसवणूक करणारी, जाता- येता काहीतरी घाणेरडी comments करणारी माणसं एकूणच खूप कमी असल्यानं आजपण 'आपल्या मदतीला येणारा माणूस हा genuine आहे' हा माझा विश्वास चुकीचा ठरला. शक्यतो बाई माणसांना गाडीची तितकीशी माहिती नसते. एकाकी रस्त्यावर गाडी बंद पडली तर त्या नक्कीच घाबरून जातात आणि अश्या वेळी समोर मदतीचा हात पुढं करणाऱ्या माणसावर भरवसा ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडं नसतो. ह्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्या माणसानं एका क्षणी गाडीची पाईप काढून घेतली आणि ६० रुपयांच्या पाईपचे सहाशे रुपये आणि वरून ती बसवून देण्याचे १००-२०० त्यानं मागितले असते असे ८०० रुपयांचा चुना लावायचा प्रयत्न केला. असं जरी त्यानं दिवसातून ४ गाडयांना केलं तर त्याला किती तरी पैसे मिळतील.
या अनुभवातून शिकलेल्या काही गोष्टी:
१. काहीही होवो कुणालाही आपल्या गाडीला हात लावू देऊ नये.
२. कुणी आपल्याला घाबरवण्यासाठी काही बोललं तर घाबरून जाऊ नये, थंड डोक्यानं त्याचा विचार करावा.
३. काहीही झालं तरी पैसे काढून देऊ नये किंवा आपली गाडी रस्त्यावर एकटी टाकून जाऊ नये.
४. आपण चालवत असलेल्या गाडीची किमान माहिती ठेवावी. सगळ्याच समस्यांचं trouble shooting आपल्याला माहित असणं अपेक्षित नसलं तरीही एक गाडीचालवताना कुठकुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात याची माहिती जरूर ठेवावी.
५. सांगायला खूप वाईट वाटतं , पण समोरच्या माणसांवर विश्वास ठेवू नये.
एकूणच काय "दुनिया बदल रही है." हेच खरं

No comments:
Post a Comment