Sunday, September 23, 2018

नको जाऊ रे ...

काय मिळविसी कान्हा मजला सोडूनिया एकटी 
यमुना तीरी राधा रडते शोकाकुल बासरी 
प्रेम तुझे ते खरे असोनि तू का जवळी नसे 
ही मथुरा आज का मला स्मशानापरी भासे 
कशी परीक्षा असे मुकुंदा वेड्या प्रितीची 
कसले बंधन कसले अंतर कसल्या रीतीची 
नको जाऊ रे सोडून कान्हा अश्रू तुला सांगती 
नको तुझा तो विरह अन नको श्वास तुझ्यावाचूनि 
अमर असे हे प्रेम आपुले अधीर परी आशा 
अरे तुला का आज ना कळे या प्रेमाची भाषा 
शपथ तुला परी देवू न शकते तव कर्तव्यापरी 
वाट पाहील हा प्राण तुझी बघ याच यमुना तीरी 


2 comments:

Unknown said...

राधे नको करुस शोक
कृष्णास असे जगताचा भार
जरी नसे तुज पास..
असे तो नेहमीच तूज्या आसपास...

sharduli said...

🙏🏻